सोमेश्वरची धुरा पुन्हा एकदा पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे तर उपाध्यक्षपदी होळकर यांची निवड.

 सोमेश्वरची  धुरा पुन्हा एकदा पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे तर उपाध्यक्षपदी होळकर यांची निवड.


  सोमेश्वरनगर दि.८ 


       बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा पुरुषोत्तम जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने त्यांनी अध्यक्षपदाची ‘हॅट्रीक’ साधली आहे. आज सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी पुरुषोत्तम जगताप यांचे नाव सुचविल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी सदोबाचीवाडी येथील आनंदकुमार होळकर यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली.


     मागील पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त करण्यात आलेले यश, राज्यात दिलेला उच्चांकी दर, उभारलेले शैक्षणिक संकुल, कामगार आणि सभासदांच्या हितासाठी घेतलेले निर्णय, सध्या सुरु असलेले विस्तारीकरण, निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश या पुरुषोत्तम जगताप यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहे. त्यांनी अध्यक्षपदाची ‘हॅट्रीक’ साधली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मार हानीचा गुन्हा दाखल

 क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मार हानीचा गुन्हा दाखल  मुंबई प्रतीनिधी. दि.२५ डोंबिवली येथे एका क्रीडा शिक्षकान...